मुंबई-आग्रा महामार्ग वर वाडिवर्हे येथील नायरा पंपाजवळ शनिवारी रात्री गंभीर अपघात घडला. मुंबईकडून नाशिककडे जाणारी मोटारसायकल अचानक घसरून पडल्याने चालक गंभीर जखमी झाला. ही घटना रात्री सुमारे ८.१० वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मोटारसायकल क्रमांक एमएच १५ ईडी ३३६५ ही नायरा पंपाजवळ आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि मोटारसायकल रस्त्यावर घसरून पडली. या अपघातात त्र्यंबक नामदेव पगार (वय ६५, रा. तळेगाव, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) हे गंभीर जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थान यांच्या ॲम्बुलन्सद्वारे तातडीने नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
