त्रंबकेश्वर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारा – महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे

बातमी शेअर करा

नाशिक (प्रतिनिधी) आज दिनांक २४/२/२०२६ मंगळवार रोजी भिमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक विभागाचे समाजकल्याण आयुक्त श्री. माधव वाघ यांची भेट घेऊन वरील विषयाची मागणी केली..निवेदनाचा विषय असा आहे की १८ जानेवारी १९२७ साली परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्र्यंबकेश्वर तालुका जिल्हा नाशिक येथील निवृत्ती नाथांची यात्रा असताना श्री. संत चोखोबा महाराज या स्थळास भेट दिली होती.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या ठिकाणी आले होते त्या स्थळांचा शासनाने विकास केला आहे..डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे त्र्यंबकेश्वर ह्या ठिकाणी आगमन झाले असल्याने ते एक ऐतिहासिक ठेवा आहे तसेच मागासवर्गीयांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी संत चोखोबांचे नावे सिटी सर्व्हे नंबर ६६२ क्षेत्र १७,८१ आर असे क्षेत्र आहे ह्या क्षेत्रावर परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारा अशी मागणी भिमटोला सामाजिक संघटनेने केली आहे..याप्रसंगी भिमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, शहराध्यक्ष मुकुंद काळे, ज्येष्ठ नेते हंसराज मोरे, युवा नेते सचिन गांगुर्डे, युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »