त्र्यंबकेश्वरः त्र्यंबकेश्वर या आदिवासी बहुल तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत झाली असून, नुकत्याच पार पडलेल्या भव्य पक्ष प्रवेश सोहळा आणि संवाद मेळाव्याला कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. जिल्हा निरीक्षक दिशा पिंकी शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमात बोलताना दिशा पिंकी शेख यांनी त्र्यंबकेश्वर सारख्या दुर्गम भागात पक्ष वाढीसाठी मेहनत घेणाऱ्या तालुकाध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. तर, प्रवक्ते बाळासाहेब शिंदे यांनी आंबेडकरी चळवळीचे त्र्यंबकेश्वर तालुक्याशी असलेले ऐतिहासिक नाते अधोरेखित केले.जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी कार्यकर्त्यांना पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी अधिक सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, प्रशिक्षण शिबिराशिवाय सक्षम कार्यकर्ते घडत नाहीत.त्यामुळे तालुक्यात कार्यकर्त्यांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करा आणि प्रत्येकाला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देऊन पक्ष संघटना अधिक बळकट करा. या सोहळ्यात त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचे नगरसेवक यांचे बंधू ऋषिकेश खाटिंगडे यांच्यासह प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष नाना दोंदे यांनी वंचितमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी त्रंबकेश्वर नगरपरिषदेचे नगर सेवक यांचे बंधू ऋषिकेश खाटिंकडे व प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष नाना दोंदे, सुमित राठोड, रोशन खैरनार, ऋषी बटाव, गणेश मोंढे आदी बहुजन कार्यकर्त्यांसोबत शेकडो युवकांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष उर्मिला गायकवाड, सम्यक जिल्हा अध्यक्ष मिहीर गजबे, युवा महानगर प्रमुख दीपक पगारे दिनेशदादा जाधव, जिल्हा महासचिव पंडित नेटावते जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, महेश भोसले, नाना तपासे, युवराज मणेर, मनोज उबाळे उदय गांगुर्डे, रोनक ठक्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
