विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीसांवर कारवाई करा – महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे

बातमी शेअर करा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (D.S) पक्षाचे शहराध्यक्ष राहुल जाधव व सहकाऱ्यांनी महसूल आयुक्त डॉ.प्रविण गेडाम साहेब यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून आज त्यांच्या उपोषणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तसेच भिमटोला सामाजिक संघटनेने पाठिंबा देऊन मागण्या लवकर मान्य न झाल्यास स्वतः रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय नाना भालेराव व भिमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे हे स्वतः उपोषण करणार असल्याचे जाहीर केले.जंतर मंतर नवी दिल्ली येथे २० जुलै रोजी शांतता पूर्वक आंदोलन सुरू असताना दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली असून दोषी पोलिसांवर कारवाई करण्यासाठी हे उपोषण सुरू आहे.

याप्रसंगी भिमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे, रिपाई (आठवले) गटाचे जिल्हाप्रमुख संजय नाना भालेराव, समीर शेख,भारत निकम, आकाश भालेराव, गोकुळ लोखंडे, संतोष पाटील,बंटी थोरात, विशाल घेगडमल, पंकज गरुड, प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »