इगतपुरी (प्रतिनिधी) | येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 2025 च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी इगतपुरी तालुक्यात सज्ज झाली असून, या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा ठराव तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला.
वाडीवऱ्हे (ता. इगतपुरी) येथे वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष अॅड. भारत बुकाने अध्यक्षस्थानी होते. बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांच्या चर्चेतून ठरविण्यात आले की, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक पातळीवर भाजप व त्यांच्या मित्र पक्षांशिवाय इतर कोणत्याही पक्षांबरोबर युती करता येईल. परंतु, जर युती झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी स्वबळावरच सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढविणार आहे.
या प्रसंगी नवनिर्वाचित तालुका कमिटीचा जेष्ठ नेते व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.बैठकीस दादा शिरसाट, तानाजी भाऊ सोनवणे, मधुकरजी बागुल, रमेश पंडित यांसारखे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. तसेच तालुका अध्यक्ष शरद सोनवणे, तालुका महासचिव डॉ. गाडे, कार्याध्यक्ष विक्रम जगताप, उपाध्यक्ष संजय सोनवणे, सचिव एन. के. सोनवणे यांच्यासह इतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
युवक तालुकाध्यक्ष संदीप भरीत, महिला शहराध्यक्षा रंजनाबाई साबळे, तसेच संतोषजी भरीत, किशोर भडांगे, अमोल जगताप, गजेंद्र बर्वे, प्रवीण भरीत, विक्रम दोंदे, संजय शेजवळ, साहेबराव गांगुर्डे, साबळे साहेब, लक्ष्मण सोनवणे आदी कार्यकर्ते उत्साहाने उपस्थित होते.
