आदिम जमातींसाठी रोजगाराचा नवा मार्ग – श्यामभाऊ गावित यांच्या प्रयत्नातून कुक्कुटपालन प्रकल्पांची सुरुवात

बातमी शेअर करा

आदिम जमातीतील कुटुंबांचे उत्पन्न वाढावे, रोजगारनिर्मिती व्हावी आणि स्थलांतर थांबावे या उद्देशाने आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून कुक्कुटपालन (बॅग पोल्ट्री) प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. हा उपक्रम आदिम श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्यामभाऊ गावित यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे साकार झाला आहे.आदिवासी विकास विभागाच्या माननीय प्रकल्प अधिकारी अर्पिताजी ठुबे मॅडम यांच्या कार्यकाळात आंबोली, टाके, हर्ष, डहाळेवाडी, अस्वली, आंबे आणि बुवाची वाडी या आदिम वस्त्यांमधील लाभार्थ्यांना कुक्कुटपालनासाठी सहाय्य देण्यात आले. या उपक्रमामुळे आदिम जमातीतील अनेक कुटुंबांना स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

या योजनेसाठी आदिम श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्यामभाऊ गावित, तसेच श्रावण भाऊ वड आणि विष्णू भाऊ यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या माध्यमातून आदिम जमातीतील समाजबांधवांना आर्थिक स्वावलंबन मिळावे आणि ते मुख्य प्रवाहात यावेत यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.कुक्कुटपालन प्रकल्पामुळे आदिम वस्त्यांतील कुटुंबांना उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध झाला असून, स्थलांतर थांबवण्यासही मदत होणार आहे. समाजाच्या उदरनिर्वाहासाठी आणि आर्थिक सबलीकरणासाठी श्यामभाऊ गावित यांचे आदिम जमातीच्या विकासाकडे विशेष लक्ष असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »