फुले दाम्पत्यांना ‘भारतरत्न’ द्या – अनिलभाई गांगुर्डे यांची मागणी; सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त नाशिकमध्ये अभिवादन

बातमी शेअर करा

दिनांक 10/3/2026 मंगळवार रोजी भिमटोला सामाजिक संघटना नाशिक जिल्ह्याच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने मुंबई नाका नाशिक येथील पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.. याप्रसंगी भिमटोला सामाजिक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे यांनी श्रद्धांजली अर्पण करतांना केंद्र सरकारने व राज्य सरकारने त्वरित फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा संघटनेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत गाडगे महाराज यांना पुरस्कार प्रदान करण्यात यावा ह्याकरिता उपोषण आंदोलने निवेदने देण्यात आली आहे..

सरकारने अद्याप आमच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही तरी ह्यावर्षी आमच्या मागणीची दखल घेऊन भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा.. याप्रसंगी भिमटोला सामाजिक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे,तालुका नेते विजय चव्हाण,महिला आघाडी नेत्या इंदुमती विधाते, सौ.सविताताई गांगुर्डे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »