पंचवटी | प्रतिनिधी. कोणार्क नगर, आडगाव येथील बापूसाहेब डी. डी. विसपुते माध्यमिक विद्यालयाने इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 चा विद्यालयाचा निकाल तब्बल 83.67 टक्के लागला असून विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.विद्यालयात सांवत हनुमान यांनी 82.60 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. ईप्पर रोशनी यांनी 80.40 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर बनसोडे मुक्ता यांनी 80.20 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक संपादन केला.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे विद्यालयाचे मुख्याध्यापक पिंगळे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मेहनत आणि मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे शालेय तसेच सामाजिक स्तरावर विद्यालयाचे कौतुक होत आहे.संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. नानासाहेब महेंदजी विसपुते तसेच सचिव मा. स्मिताजी महेंद विसपुते यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे अभिनंदन करत पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
