आदिवासी शक्ती सेनेचा सामाजिक उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, स्व. रमेश भाऊ बांगारे यांच्या जयंतीनिमित्त शेवगेडांग फणसवाडी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात

बातमी शेअर करा

इगतपुरी : आदिवासी नेते स्व. रमेश भाऊ बांगारे यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी शक्ती सेना यांच्या वतीने अनुसूचित जाती-जमातीतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेवगेडांग फणसवाडी येथे आयोजित कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी आदिवासी शक्ती सेना इगतपुरी तालुका युवा अध्यक्ष सोमनाथ रमेशभाऊ बांगारे, संपर्क प्रमुख मुकेश जाधव, पत्रकार गणेश लहामटे, राहुल जाधव, शांताराम बांगरे, सोमा वारघडे, वैभव लांडे, रितेश बांगारे आदी मान्यवर उपस्थित होते.या उपक्रमाबद्दल ग्रामस्थ, पालक व विद्यार्थ्यांनी आदिवासी शक्ती सेनेच्या कार्याचे कौतुक केले. शाळेचे मुख्याध्यापक सूर्यवंशी सर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »