त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) :कौशल्य विकास आणि रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या दादासाहेब फाळके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथे शैक्षणिक वर्ष २०२६ साठी विविध व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी (Trades) प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या मागणीनुसार विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्य मिळावे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने संस्थेत विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA), फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, फिटर, इलेक्ट्रिशियन, टूल अँड डाय मेकर आणि मशिनिस्ट या व्यवसायांचा समावेश आहे.संस्थेतील अनुभवी व तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात रोजगाराच्या संधी मिळण्यास मदत होते.
प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला, इयत्ता १० वीची गुणपत्रिका, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र (लागू असल्यास) आणि पासपोर्ट साईज फोटो आवश्यक राहतील.प्रवेश अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू असून इच्छुक विद्यार्थ्यांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संस्थेच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
