भारतीय बौद्ध महासभा, नाशिक जिल्हा (पश्चिम) अंतर्गत इगतपुरी तालुका व इगतपुरी शहर शाखेची नवीन कार्यकारिणी निवड प्रक्रिया रविवार, 19 जुलै 2026 रोजी सुगत बुद्ध विहार, इगतपुरी येथे पार पडणार आहे. ही निवड प्रक्रिया जिल्हाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होणार असून संघटनेच्या आगामी कार्याचा आराखडा आणि नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.या बैठकीस इगतपुरी तालुक्यातील सर्व केंद्रीय शिक्षक-शिक्षिका, बौद्धाचार्य, श्रामणेर, समता सैनिक, तसेच आजी-माजी पदाधिकारी आणि महासभेचे कार्यकर्ते यांनी दुपारी 12 वाजता वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.भारतीय बौद्ध महासभेच्या संघटनात्मक बळकटीसाठी ही निवड प्रक्रिया महत्त्वपूर्ण मानली जात असून तालुक्यातील सर्व संबंधितांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असेही आयोजकांनी नमूद केले आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण : सुगत बुद्ध विहार, इगतपुरी,
दिनांक : 19 जुलै 2026 (रविवार)वेळ : दुपारी 12.00 वाजता
आयोजक : भारतीय बौद्ध महासभा, इगतपुरी तालुका.
