विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन प्रयास फाऊंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून विविध तालुक्यांतील जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा विस्तार करत त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा, पेठ, हरसूल, मोखाडा यांसह विविध भागांतील तब्बल 951 जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लागावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.पत्रकार काळू गांगुर्डे व पत्रकार मिलिंद सोनवणे यांनी स्थानिक पातळीवर या उपक्रमासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे तळेगाव काचुर्ली व नांदडगाव येथील विद्यार्थ्यांनाही या उपक्रमाचा लाभ मिळाला. त्यामुळे पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले.यावेळी सुराणा सर, नवल आहेर, संजय कुमार, अंबादास पालवे, पेगलवाडीचे माजी सरपंच, पत्रकार दीपक भाऊ भंगाळे, रघुनाथ उजे, कल्पना अहिरे यांच्यासह विविध मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याने त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळणार असून, सामाजिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी, सुरगाणा, पेठ, हरसूल व मोखाड्यातील 951 जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप
