बाह्यवळण रस्ता व रेल्वे उड्डाणपुलामुळे लासलगावची वाहतूक कोंडी सुटणार

बातमी शेअर करा

लासलगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या बाह्यवळण रस्ता, पोहोच मार्ग आणि रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचे उद्घाटन आज शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट रोजी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगनरावजी भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी १०९.६८ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज लासलगाव बाह्यवळण रस्ता, रेल्वे उड्डाणपूल, लासलगाव – पाटोदा रस्त्यावरील बाजारतळ येथील पुलाचे लोकार्पण, तर लासलगाव -पालखेड -पिंपळगाव बसवंत रस्त्याच्या रुंदीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. लासलगाव शहरातून होणारी अवजड वाहनांची वाहतूक बाह्यवळण रस्त्याने वळविण्यात येणार असल्याने शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच रेल्वे उड्डाणपुलामुळे रेल्वे मार्गावरील वाहतुकीची अडचण दूर होऊन नागरिकांना अधिक सुलभ वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे लासलगाव शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे.

यावेळी माजी खासदार समीरभाऊ भुजबळ, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, लासलगाव बाजार समितीचे सभापती डी. के. जगताप, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, उपसभापती ललित दरेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, बाळासाहेब क्षीरसागर, डॉ. श्रीकांत आवारे, तानाजी आंधळे, सुवर्णाताई जगताप, सोनिया होळकर, छबुराब जाधव, गणेश डोमाडे, श्री रमेश पालवे, महेश पठारे, भीमराज काळे, बाळासाहेब दराडे, लासलगावच्या सरपंच योगिता पाटील, गुणवंत होळकर, दत्तुपंत डुकरे, मेघा दरेकर, डॉ. वैशाली पवार, दत्ता रायते, भारत कानडे, भाऊसाहेब बोचरे, विनोद जोशी, सचिन दरेकर, सुरेखा नागरे, राहुल डुंबरे, वाल्मिक उगलमुगले, अशोक नागरे, रामकृष्ण दराडे, विनोद जोशी, शिवाजी सुपनर, डॉ. विकास चांदर, कैलास सोनवणे, शेखर होळकर, योगेश पाटील, शिवाजी सुपनर, भारत कानडे, कैलास सोनवणे, अफजल शेख, बाळासाहेब पिंपरकर, रामभाऊ जगताप, भावराव दराडे, मकरंद सोनवणे, मधुकर गायकर, गोटू मांजरे, जावेद लखपती, बाळासाहेब पुंड, प्रकाश पाटील, संजय तोडकर, राजेंद्र चाफेकर, पांडुरंग राऊत, अनिल सोनवणे, मंगेश गवळी, बालेश जाधव, विलास गोरे, नारायण पालवे, बबन शिंदे, ज्योती शिंदे, मधुकर गावडे, शिवनाथ माऊली, समाधान जेजुरकर, सोहेल मोमिन, माधव जगताप, गोरख शिंदे, इस्माईल मोमिन, भाऊसाहेब गांगुर्डे, व्यापारी मनोज जैन, तहसीलदार विशाल नाईकवाडी, सहाय्यक गटविकास अधिकारी पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रकाश घोडे, शाखा अभियंता गणेश चौधरी, शाखा अभियंता संकेत चौधरी, लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, व्यापारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »