साक्ष न्यूज: उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यपदी ज्येष्ठ समाजसेवक ह.भ.प. डॉ. रवींद्र भोळे यांची निवड झाल्याबद्दल साने संगीत विद्यालयातर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यालयाचे सर्वेसर्वा शिवराज साने यांच्या हस्ते डॉ. भोळे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार बापुसो चौधरी उपस्थित होते. सत्कारप्रसंगी शिवराज साने यांनी डॉ. भोळे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने केलेले कार्य उल्लेखनीय असून, त्यांच्या अनुभवाचा व सेवाभावी वृत्तीचा रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून नागरिकांना निश्चितच लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.पत्रकार बापुसो चौधरी यांनीही डॉ. भोळे यांचे अभिनंदन करून, आरोग्य क्षेत्राशी संबंधित समितीवर काम करण्याची मिळालेली संधी ते सामाजिक बांधिलकीने पार पाडतील, असा विश्वास व्यक्त केला.यावेळी उपस्थितांनी डॉ. रवींद्र भोळे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यपदी डॉ. रवींद्र भोळे; साने संगीत विद्यालयातर्फे सत्कार
