पंचवटी प्रतिनिधी: नाशिक महानगरपालिका अंतर्गत मातोश्री शाळेत वृंदावन नगर आयुष्मान आरोग्य मंदिरतर्फे हेल्थ अँड वेलनेस अॅक्टिव्हिटी अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमास नाशिक महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर, पंचवटी विभागाचे वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. शैलेश खुणे आणि डॉ. सारिका पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
डॉ. ऋतुजा सानप, स्टाफ नर्स आणि आशासेविका यांच्या पुढाकाराने कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना आरोग्य, व्यायाम आणि तंदुरुस्तीचे महत्त्व डॉ. ऋतुजा सानप यांनी समजावून सांगितले.कार्यक्रमाच्या शेवटी मातोश्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर कोणार्क नगर आडगाव येथील मुख्याध्यापक श्री. मुनिंद्र अहिरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले तसेच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन बक्षीस वितरण करून त्यांचा उत्साह वाढवला.
