इगतपुरीत वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक संपन्न; जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांची रणनिती ठरली

बातमी शेअर करा

इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे आज शनिवार, दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी हॉटेल साई दरबार येथे वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीचे आयोजन इगतपुरी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले होते.

या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेषतः नुकत्याच पार पडलेल्या इगतपुरी नगरपालिकेच्या निवडणुकीतील यशापयशाचा सखोल अभ्यास करत पुढील वाटचालीबाबत चर्चा करण्यात आली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांना सामोरे जाताना वंचित बहुजन आघाडीने कोणत्या पद्धतीने तयारी करावी, संघटनात्मक बळ कसे वाढवावे आणि जनतेपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे कशी पोहोचवावी, यावर सविस्तर विचारमंथन झाले.

श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तसेच नाशिक जिल्हा अध्यक्ष चेतन दादा गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये पक्ष अधिक ताकदीने उतरवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हा संघटक नंदू मामा पगारे यांनी भूषविले. नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा संघटक याचे इगतपुरी तालुक्याच्या वतीनी सहमतानें स्वागत करण्यात आले

या आढावा बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे इगतपुरी तालुका अध्यक्ष शरद भाऊ सोनवणे, महासचिव डॉ. आर. वाय. गाडे, जिल्हा उपाध्यक्ष दादा मामा शिरसाठ, संजय सोनवणे, शहर अध्यक्ष रंजना ताई साबळे, मिलिंद शिंदे, एन. के. सोनवणे, सुनील चंद्रमोरे, तालुका संघटक साहेबराव गांगुर्डे, संतोष उबाळे, भूषण पंडित, तेजस जगताप, दीपक शिरसाठ, मधुकर बागुल, रमेश पंडित, युवा महासचिव तुषार हांडोरे, जिल्हा उपाध्यक्ष मुन्वर शेख, शांताराम उबाळे गुरुजी, संजय शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीमुळे आगामी निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या तयारीला गती मिळाल्याचे चित्र दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »