“यासकावा इंडिया” कंपनीच्या CSR उपक्रमातून वाघेरा शाळेला नवे भोजनकक्ष व बहुउद्देशीय शेड; ३२९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

बातमी शेअर करा

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा वाघेरा येथे यासकावा इंडिया प्रा. लि. कंपनीच्या CSR उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या नवीन भोजनकक्ष व बहुउद्देशीय शेडचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. सदर बांधकाम फेब्रुवारी २०२६ मध्ये पूर्ण झाले असून, दिनांक १७ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता कंपनीचे संचालक व CEO तसेच यासकावा इंडिया कंपनीच्या टीमच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ व सुरक्षित वातावरणात भोजन घेण्याची तसेच विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यासाठी उत्तम सुविधा उपलब्ध झाली आहे.CSR अंतर्गत हे बांधकाम अनुदान मिळवून देण्यासाठी वाघेरा शाळेतील सहशिक्षिका सौ. जयश्री विठ्ठल भारती यांनी त्यांच्या चिरंजीव श्री. हर्षल विठ्ठल भारती यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. शालीवान कदम व सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी श्री. विजय पगार, केंद्रप्रमुख श्रीमती सुनिता बच्छाव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळु बेंडकोळी, उपाध्यक्ष राजाराम वाडघे, सरपंच यशोदा खेडूलकर, उपसरपंच रामचंद्र बदादे, गणपत जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेतील सर्व ३२९ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी यासकावा इंडिया कंपनीचे संचालक चेअरमन मा. शैलेंद्र साळवी, असिस्टंट जनरल मॅनेजर मा. राजेशजी सो, मॅनेजर मा. बबीता वर्मा, कंपनी सेक्रेटरी मा. महेश कुमार, मॅनेजर सेल्स मा. प्रमोद पांडे, डेप्युटी मॅनेजर मा. हर्षल भारती व मॅनेजर HR मा. राघवेंद्र के. यांची प्रमुख उपस्थिती होती.या उपक्रमामुळे वाघेरा शाळेच्या शैक्षणिक व पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडली असून ग्रामस्थांनी कंपनीचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »