मातोश्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

बातमी शेअर करा

मुनींद्र अहिरे सर (पंचवटी प्रतिनिधी): अनमोल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर, कोणार्क नगर, आडगाव (नाशिक) येथे थोर समाजसुधारिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक मुनिंद्र अहिरे सर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक व स्त्री शिक्षणासाठी केलेल्या महान कार्याविषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित प्रभावी नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. नाटिकेतून स्त्री शिक्षणाचे महत्त्व, समाजातील अडचणींवर मात करत सावित्रीबाईंनी केलेला संघर्ष प्रभावीपणे मांडण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मासुळे सर यांनी केले. कार्यक्रमास शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, समानता व शिक्षणाचे महत्त्व रुजविण्यात आले.संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी ठरला असून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »