वैतरणा इंग्लिश स्कूलचा नवोदय परीक्षेत दमदार यश; ११ पैकी ५ विद्यार्थी उत्तीर्ण, कौतुक सोहळा उत्साहात

बातमी शेअर करा

इगतपुरी (प्रतिनिधी) :आदिवासी उन्नती मंडळ संचलित वैतरणा इंग्लिश स्कूल, वैतरणानगर (ता. इगतपुरी, जि. नाशिक) येथील विद्यार्थ्यांनी नवोदय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाचा गौरव वाढवला आहे. सन २०२५-२६ शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या नवोदय परीक्षेत ११ पैकी तब्बल ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.नवोदय प्रवेश परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अर्णव प्रकाश मोहिते, अथर्व नितीन खोडके, अर्पिता शिवकांत मांगे, अस्मिता बाळू ताठे आणि सत्यम मधुकर सांगळे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनातून मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद मानले जात आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे दिनांक २४ मार्च २०२६ रोजी विद्यालयात विशेष कौतुक सोहळा आयोजित करून सत्कार करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व शुभेच्छा देऊन त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले.कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष गणपतराव वाघ, सचिव शंकर दादा वाघ, मुख्याध्यापक अमोल ढेरिंगे सर तसेच शिक्षकवृंद मोरे सर, वाघ सर, भाऊसाहेब वाघ सर, सागर सर, कामडी सर, कार्तिकीय सर, सोनवणे मॅडम, जाधव मॅडम उपस्थित होते. याशिवाय लाड मामा, किरण खातळे तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सांगितले की, ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या जोरावर मोठी प्रगती साधू शकते. विद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे हे यश शक्य झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »