व्हॉईस ऑफ मिडिया मार्फत इगतपुरीत पत्रकार दिन उत्साहात साजरा ; पत्रकारांचा सन्मान व विमा संरक्षणाची ऐतिहासिक पहल

बातमी शेअर करा

आज दिनांक ६ जानेवारी रोजी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रेरणेने व पत्रकार दिनानिमित्त व्हॉईस ऑफ मिडिया, इगतपुरी तालुका यांच्या वतीने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम कला व वाणिज्य महाविद्यालय, महात्मा गांधी हायस्कूल कॅम्पस, इगतपुरी येथे संपन्न झाला.या कार्यक्रमात इगतपुरी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विमा संरक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात आला, ही बाब पत्रकारितेच्या क्षेत्रासाठी अत्यंत कौतुकास्पद व प्रेरणादायी ठरली.

कार्यक्रमास श्री. कल्किराम महाराजजी (पिठाधीश्वर, आदिनाथ संप्रदाय – भारत), गोरख बोडके (राष्ट्रवादी काँग्रेस), ज्ञानेश्वर लहाने (चेअरमन, मार्केट कमिटी), नवनिर्वाचित नगराध्यक्ष शालिनी खातळे, नगरसेवक तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या कार्यक्रमाचे आयोजन भास्कर सोनवणे (जिल्हा उपाध्यक्ष, नाशिक),राजू देवळेकर, विकास काजळे (तालुकाध्यक्ष – व्हॉईस ऑफ मिडिया, इगतपुरी),संदीप कोतकर (डिजिटल सेल, तालुकाध्यक्ष),सुमित बोधक (शहराध्यक्ष),गणेश घाटकर (डिजिटल सेल, शहराध्यक्ष),शहाबाज शेख (अध्यक्ष – पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती),शैलेश पुरोहित (खजिनदार)यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.यासोबतच वैभव तुपे, समाधान कडवे, लक्ष्मण सोनवणे, शरद धोंगडे, एकनाथ शिंदे, गौरव परदेशी, मिलिंद सोनवणे, शांताराम भांगे, लक्ष्मीकांत शिंदे, भगीरथ आतकरी, प्रशांत निकाळे, निलेश काळे आदी पदाधिकारी व पत्रकार बांधवांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमातून पत्रकारांच्या कार्याचा सन्मान करताना त्यांच्या सुरक्षिततेविषयी सकारात्मक संदेश देण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी पत्रकारितेचे सामाजिक दायित्व अधोरेखित करत निःपक्ष व निर्भीड पत्रकारिता टिकविण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »