संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानकडून नूतन वर्ष २०२६ ची आकर्षक दिनदर्शिका प्रकाशित; पौष वारी यात्रेची जय्यत तयारी सुरू

बातमी शेअर करा

साक्ष न्यूज: संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान ट्रस्टच्या वतीने शनिवारी आयोजित विशेष कार्यक्रमात नूतन वर्ष २०२६ ची दिनदर्शिका (कॅलेंडर) मोठ्या उत्साहात प्रकाशित करण्यात आली. या कार्यक्रमास ट्रस्टचे विश्वस्त मंडळ, पदाधिकारी तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.ही दिनदर्शिका अत्यंत आकर्षक व उपयुक्त स्वरूपाची असून त्यामध्ये विविध धार्मिक उत्सवांसह एकादशी, पालखी सोहळा तसेच वारकरी संप्रदायासाठी महत्त्वाच्या तारखांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. भाविकांना वर्षभर मार्गदर्शक ठरेल अशी ही दिनदर्शिका असल्याने उपस्थितांनी तिचे विशेष कौतुक केले.

दरम्यान, संत निवृत्तीनाथ महाराजांची पौष वारी यात्रा येत्या १४ जानेवारी २०२६ रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर ट्रस्टचे विश्वस्त मंडळ वारकरी भाविकांना उत्तम सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अधिक सक्रिय झाले आहे. यात्रेच्या नियोजनासाठी पदाधिकारी नियमितपणे तयारीचा आढावा घेत असून, भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी दक्षता घेतली जात आहे.आगामी पौष वारी यात्रेसाठी प्रशासन व ट्रस्टच्या समन्वयातून सर्व आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »