पिंपळद (त्र्यंबकेश्वर) येथे भव्य बौद्धाचार्य श्रामनेर संघ प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ

बातमी शेअर करा

त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद येथे दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय बौद्ध महासभा, नाशिक जिल्हा (प.) अंतर्गत तालुका शाखेच्या वतीने भव्य बौद्धाचार्य श्रामनेर संघ प्रशिक्षण शिबिरास उत्साहात प्रारंभ झाला. शिबिराचे उद्घाटन भन्ते डॉ. सुमेत बोधी यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी केंद्रीय शिक्षक के. वाय. सुरवाडे गुरुजी, जिल्हा सरचिटणीस शरद भोगे गुरुजी, जिल्हा संस्कार उपाध्यक्ष कृष्णा सोनवणे गुरुजी, जिल्हा संघटक प्रभारी अरुण शिंदे आदी पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. सात शिबिरार्थींनी प्रशिक्षणासाठी सहभाग नोंदवला आहे.

तालुका अध्यक्ष रमेश जाधव, सरचिटणीस हनुमंत देहाडे, कोषाध्यक्ष साहेबराव पालवे, संस्कार उपाध्यक्ष संजय कांबळे यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांनी शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी ग्रामस्थ, उपासक-उपासिका, पत्रकार व विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, पिंपळद येथे बुद्ध विहार उद्घाटन व श्रामनेर शिबिराच्या सांगता समारंभासाठी भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर साहेब उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक नेतेमंडळी सहभागी होणार असून भोजनदान, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच नाशिकचे प्रसिद्ध गायक संतोष जोंधळे यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झाले असून ग्रामस्थांकडून सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »