महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, त्र्यंबकेश्वर मंडल (शहर व तालुका) यांच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आज पिंप्री येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.या उपक्रमांतर्गत पिंप्री येथील विनाअनुदानित आश्रम शाळा तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंप्री येथे विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, दप्तरासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, शिक्षणाची आवड वाढावी आणि गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी भाजपा त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर, शहराध्यक्ष तेजस ढेरगे, गटनेते कैलास चोथे, तालुका सरचिटणीस भावेश शिखरे, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष विलास (मामा) देवरे, जिल्हा चिटणीस कमलेश जोशी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस विजय महाले, जिल्हा सदस्य तथा अंजनेरी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजाराम चव्हाण, तालुका उपाध्यक्ष सुयोग शिखरे व पांडुरंग कोरडे, शहर उपाध्यक्ष गोटीराम बोडके व मयूर वाडेकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष अश्विनी आडसरे, महिला शहराध्यक्ष स्नेहल भालेराव, विराज मुळे, श्रीराज कन्नाव, वैद्यकीय आघाडी शहराध्यक्ष डॉ. रोहित शेजवळ, ओबीसी तालुकाध्यक्ष बंडू आहेर, ओबीसी शहराध्यक्ष प्रविण पाटील, महिला आघाडीच्या पदाधिकारी वैष्णवी वाडेकर, नीलिमा धारणे, मयुरी भुजंग, तन्वी ढेरगे, आदिवासी आघाडी जिल्हा सरचिटणीस जयवंत हागोटे, आदिवासी आघाडी तालुका उपाध्यक्ष रमेश आचारी, पिंपरीचे सरपंच रामदास कुंदे, तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साहामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे वातावरण लाभले.
