महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा जिल्हा मेळावा उत्साहात संपन्न; नवीन जिल्हा कार्यकारिणी व सुकाणू समितीची निवड

बातमी शेअर करा

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा जिल्हा मेळावा राज्य सचिव श्री. कैलास बोढारे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष श्री. अनिल बागुल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी शिक्षकांच्या अडीअडचणी व कार्यकर्त्यांच्या विविध प्रश्नांवर सखोल मार्गदर्शन केले.मेळाव्यात शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी संघटनेच्या नवीन जिल्हा कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. यामध्ये जिल्हा अध्यक्षपदी श्री. राहुलजी सोनवणे, सचिवपदी श्री. सुनील मोरे, कार्याध्यक्षपदी श्री. सुधाकर आहिरे आणि कोषाध्यक्षपदी श्री. कुंदन दाणी यांची एकमताने निवड झाली.

त्याचप्रमाणे संघटनेच्या जिल्हा सुकाणू समितीच्या अध्यक्षपदी श्री. बाजीराव परदेशी यांची तर सदस्यपदी श्री. कैलास बोढारे, श्री. अनिल बागूल व श्री. बाबुलाल सोनवणे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. बी. जे. सोनवणे, श्री. सिद्धार्थ सपकाळे, श्री. सुभाष लोहकरे, श्री. धनंजय शिंदे, श्री. सोपानजी लहिरे, श्री. किरण अहिरे, श्री. राजेश बावनगडे, श्री. पोपटजी घाणे, श्री. संतोष श्रीवंत, श्री. माणिक भालेराव, श्री. पंडित गायकवाड, श्री. नरहरी वाघमारे, श्री. मंगेश नन्नवरे, श्री. चंद्रकांत मोरे आणि श्री. देविदास वाघ यांनी विशेष परिश्रम घेऊन मोलाचे सहकार्य केले.संघटनेच्या राज्य शाखेच्या वतीने सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सुकाणू समिती सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »