दिंडोरीतील तिल्लोळी शाळेत उत्साहात जागतिक आदिवासी दिन साजरा

बातमी शेअर करा

नाशिक / दिंडोरी (विशेष प्रतिनिधी): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तिल्लोळी (ता. दिंडोरी) येथे ‘जागतिक आदिवासी दिन’ अत्यंत उत्साही आणि सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत विविध सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपारिक आदिवासी वेषभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच मनिषाताई भरसट या होत्या. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगन भरसट, उपाध्यक्ष खंडेराव गांगोडे, माजी सरपंच सिताराम पवार, कचरू भरत, देविदास पवार, वाल्मीक गायकवाड, रमेश भरसट, रामदास भरसट, कांतीलाल भुसारे, ग्रामसेवक रावसाहेब मिस्तरी, एकनाथ भरसट, अंगणवाडी सेविका सुनिता चौधरी व शालिनी भरसट यांच्यासह ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृती, परंपरा आणि निसर्ग संवर्धनाचे महत्त्व सांगणारी मनमोहक लोकनृत्यं व गीते सादर केली. तसेच गावातील महिला, शिक्षिका व युवकांनीही उत्साहाने पारंपारिक नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. या सर्व नृत्यांचे उत्कृष्ट दिग्दर्शन शिक्षिका कविता पाटील यांनी केले होते.याप्रसंगी शाळेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवर, पालक व विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षिका ज्योती तुंगार यांनी केले, तर आभार प्रदर्शन वृषाली दहिवेलकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »